Sharad Pawar : ‘थेट डोळ्यात गोळ्या घातल्या..’ आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव

Sharad Pawar : ‘थेट डोळ्यात गोळ्या घातल्या..’ आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव

| Updated on: Apr 24, 2025 | 12:36 PM

Asawari Jagdale : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांच्या मुलीने खासदार शरद पवार यांना हल्ल्याचा धक्कादायक अनुभव सांगितला.

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांच्या मुलीने खासदार शरद पवार यांना हल्ल्याचा धक्कादायक अनुभव सांगितला. दहशतवाद्यांनी डोळ्यात गोळ्या घातल्या असं आसावरी जगदाळे हिने सांगितलं. त्यांनी लहान मुलांना देखील सोडलं नाही, हे सांगताना आसावरीचे डोळे भरून आलेले बघायला मिळाले.

पहलगाम हल्ल्यात पुण्यातील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी शरद पवार यांनी या दोन्ही कुटुंबांना सांत्वनपर भेट दिली. त्यावेळी कुटुंबाने पवार यांना आपला धक्कादायक अनुभव सांगितला. त्यांनी गोळ्या घातल्या, काहीही न विचारता त्यांनी थेट डोळ्यात गोळ्या घातल्या. त्यांनी मास्क लावलेला होता. शेर आला शेर आला म्हणून ते पळून गेले. तिकडे कोणीच नव्हतं. सुरक्षा रक्षक किंवा अधिकारी असणं गरजेचं होतं. त्यांना तशाच गोळ्या घाला. लहान लहान मुलांना गोळ्या घातल्या, हे सांगताना आसावरी जगदाळेचे अश्रु अनावर झाले.

Published on: Apr 24, 2025 12:35 PM