”महापालिका निवडणुका घेतल्या नाही तर लोक रस्त्यावर उतरतील”; सरकारला कोणी दिला इशारा?
उद्धव ठाकरे सरकारने सुरु केलेल्या अनेक योजनांमध्ये शिंदे-फडणवीस सरकारने खोडा घातला. शहरात प्रस्तावित रस्ते विकास कामांत कपात करण्यात आल्याच्या टीका याच्या आधी औरंगाबाद शहराचे माजी महापौर आणि शिवसेना नेते नंदकुमार घोडेले यांनी केली होती
औरंगाबाद : औरंगाबाद शहर फक्त राजकारणासाठी हवं होतं. विकासकामांकडे त्यांचं लक्ष नाही. उद्धव ठाकरे सरकारने सुरु केलेल्या अनेक योजनांमध्ये शिंदे-फडणवीस सरकारने खोडा घातला. शहरात प्रस्तावित रस्ते विकास कामांत कपात करण्यात आल्याच्या टीका याच्या आधी औरंगाबाद शहराचे माजी महापौर आणि शिवसेना नेते नंदकुमार घोडेले यांनी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा घोडेले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाना साधला आहे. तसेच देशाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झालं आहे की एका स्वराज्य संस्थेवर साडेतीन वर्षांपासून अधिक काळ प्रशासक असावा. हे लोकशाहीला छेद देण्याचे काम आहे. या सरकारला काहीना कारणाने निवडणूका पुढे ढकलायच्या आहेत. हे सरकार निवडणूका घ्यायला घाबरतं. मात्र आता जनता त्रस्त झाली आहे. तीच आता उठाव करेल. मग हेच सरकार निवडणूकांना समोरे जाईल.
Published on: May 30, 2023 12:04 PM
