Bachchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कडू आक्रमक

Bachchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कडू आक्रमक

| Updated on: Jun 08, 2025 | 1:14 PM

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नसल्याने प्रहारचे माजी आमदार बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहेत. आजपासून कडू यांच्याकडून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार प्रमुख बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेले आहेत. आजपासून गुरुकुंज मोजरीमध्ये तुकडोकजी महाराजांच्या समाधी परिसरात अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहेत. तसंच गाडगे बाबा मंदिरापासून तुकदोजी महाराजांच्या समाधी स्थळापर्यंत बाइक रॅली देखील काढण्यात येणार आहे. दरम्यान, या बाइक रॅलीमध्ये 20 हजार शेतकरी आणि कार्यरते सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यात शेतकऱ्यांना यंदा आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी मिळणार नसल्याचं घोषित करण्यात आलं आहे. त्यानंतर शेतकरी हवालदिल झालेले आहेत. राज्यात आधी दुष्काळ त्यानंतर अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे आता बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येत आहे. रुकुंज मोजरीमध्ये तुकडोकजी महाराजांच्या समाधी परिसरात हे आंदोलन केलं जात आहे.

Published on: Jun 08, 2025 01:14 PM