वय 90 वर्षीय आजोबांना 2 वेळा कोरोना, पण दोन्ही वेळा दिला यशस्वी लढा
BEED CORONA

वय 90 वर्षीय आजोबांना 2 वेळा कोरोना, पण दोन्ही वेळा दिला यशस्वी लढा

| Updated on: Apr 24, 2021 | 8:40 PM

वय 90 वर्षीय आजोबांना 2 वेळा कोरोना, पण दोन्ही वेळा दिला यशस्वी लढा

बीड  : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून रोज हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. रुग्ण वाढल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडू लागला आहे. त्यामुळ मृतांच्या संख्येतसुद्धा लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. मात्र, बीडमधील एका आजोबांनी तब्बल दोन वेळा कोरोनाला परतवून लावलं आहे. दोन वेळा कोरोनाची लागण होऊनही त्यांनी दोन्ही वेळा कोरोनाविरोधा यशस्वी लढा दिला आहे.