Beed News : बीड पोलीस दलात खांदेपालट; तब्बल 606 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Beed News : बीड पोलीस दलात खांदेपालट; तब्बल 606 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

| Updated on: May 22, 2025 | 7:00 PM

Beed Police Transfer : बीड जिल्हा पोलीस दलात तब्बल 606 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी हा निर्णय घेतला आहे.

बीड जिल्हा पोलीस दलात खांदा पालट झालेला आहे. यात जिल्ह्यातील तब्बल 606 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची बिघडती परिस्थिती आणि पोलीस यंत्रणेवरील वाढत्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, या निर्णयाने बीडच्या पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर बीड पोलीस यंत्रणेवर नागरिकांचा विश्वास उडाला होता. जिल्ह्यात दिवसाढवळ्या होणारे अपहरण, दरोडे, मारहाणीच्या घटनांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासोबतच पोलीस खात्यावर सातत्याने होणारे आरोप आणि कामकाजावर उपस्थित होणाऱ्या शंका यामुळे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी हा कठोर निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. बदली झालेल्या 606 कर्मचाऱ्यांमध्ये अंमलदारांचा समावेश आहे.

Published on: May 22, 2025 07:00 PM