Beed Vaibhavi Deshmukh Video : ‘माझ्या वडिलांना फक्त 3 तासात संपवलं, मग आरोपींना…’, बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ

Beed Vaibhavi Deshmukh Video : ‘माझ्या वडिलांना फक्त 3 तासात संपवलं, मग आरोपींना…’, बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ

| Updated on: Feb 09, 2025 | 2:51 PM

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटले आहेत. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा आरोपी तपास यंत्रणेच्या हाती लागलेला नाही

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटले. या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा आरोपी पोलीस यंत्रणाच नाही तर राज्य गुन्हे अन्वेषण विभागासह विशेष तपास पथकाला हुलकावणी देत असल्याने सरकारसमोर आव्हान उभं केलं आहे. तर काही जण त्याची हत्या झाल्याचा दावा करत आहेत. अशातच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला दोन महिने उलटल्यानंतर वैभवी देशमुखने माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘अद्याप आरोपी फरार आहे. ते जेलबंद होत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई कधी होणार? आणि आम्हाला न्याय कधी मिळणार?’, असा सवाल प्रशासनाला सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी केला. पुढे प्रशासनाला विनंती करत वैभवी देशमुख असेही म्हणाले की, ‘संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील किंवा त्यांना मदत करणारे कोणीही असतील त्यांना लवकरात लवकर ताब्यात घ्या… एसआयटी आणि सीआयडी या हत्या प्रकरणाचा तपास करत असूनही अद्याप आरोपी फरार आहे. याची खंत वाटते. आरोपींनी माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग आरोपींना पकडण्यासाठी अटक करण्यासाठी एवढा वेळ का? आज या घटनेला दोन महिने उलटून गेलेत. त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की, आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा’, असे वैभवी देशमुख हिने आपल्या वडिलांच्या हत्येनंतर खंत व्यक्त केली.

Published on: Feb 09, 2025 02:51 PM