गाड्यांची ये-जा सुरू होती, अन् वाघोबा आपल्या थाटात रस्ता ओलांडत होता…
भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 6 वर साकोली येथील मोहगाव जंगल परिसरात वाघाचं दर्शन झालंय. पाहा...
भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 6 वर साकोली येथील मोहगाव जंगल परिसरात वाघाचं दर्शन झालंय. रस्ता ओलांडताना वाघाचं दर्शन झालंय.नवेगाव नागझिरा अभयारण्य असल्यानं तिथून हा वाघ आल्याचं बोललं जातय. दरम्यान या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने मजूरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाला लागून हा महामार्ग आहे. यापूर्वी अनेकदा या महामार्गावर बिबट्यासह इतरही अनेक वन्यप्राणी मृत्युमुखी पडले आहेत.
Published on: Feb 08, 2023 09:24 AM
