कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार

| Edited By: | Updated on: Apr 22, 2025 | 9:01 PM

जम्मू -कश्मीरात अनेक सर्वात मोठी अतिरेकी हल्ला झाला आहे. पर्यटकांवर अंधाधुंद फायरिंग झाल्याने २७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जम्मू – कश्मीर येथील पहलगाम येथे मंगळवारी सकाळी अतिरेक्यांनी अमानुष हल्ल्यात २७ पर्यटक ठार झाल्याचे उघडकीस आले आहे. जम्मू-कश्मीराल कलम ३७० रद्द केल्यानंतराचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ल्या असल्याचे म्हटले जात आहे. एकीकडे मुंबईवरील २६/११ हल्ल्याची आठवण करुन देणारा हा हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. या जम्मू-कश्मीरातील पहलगाम येथे पर्यटकांना त्यांची नावे विचारुन टार्गेट करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदीवरुन फोन करुन गृहमंत्री अमित शाह यांना पहलगामला जाण्याचे आदेश दिले आहेत. या हल्ल्यात महाराष्ट्र,कर्नाटक, आजूबाजूचे पर्यटक कश्मीरात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेले असता हा हल्ला झाला आहे. अमरनाथ यात्रा एक महिन्यावर आली असताना दहशत पसरवण्यासाठी हा हल्ला केल्याचे म्हटले जात आहे.

Published on: Apr 22, 2025 08:04 PM