Mumbai : बीएमसी सभागृहाबाहेर भाजप नगरसेवकांची निदर्शने, मानखुर्द येथील उड्डाणपुलाचं नाव बदलण्याची मागणी
भाजपच्या नगरसेवकांनी पालिकेच्या बाहेर जोरदार निदर्शने केली आहेत. मानखुर्द येथील उड्डाणपुलाचं नाव बदलण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. मानखुर्द येथील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावे यासाठी भाजप नगरसेवकांनी जोर लावून धरला.
भाजपच्या नगरसेवकांनी पालिकेच्या बाहेर जोरदार निदर्शने केली आहेत. मानखुर्द येथील उड्डाणपुलाचं नाव बदलण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. मानखुर्द येथील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावे यासाठी भाजप नगरसेवकांनी जोर लावून धरला. यावेळी पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय नावाच्या घोषणांनीही यावेळी परिसर दुमदुमून गेला. याबाबत आता पालिका प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षांना काय वावडं आहे? असा सवाल यावेळी भाजकडून करण्यात आला.
