Goa Election 2022 | विश्वास आणि विकासाच्या आधारावर जनतेने मतं दिली - Devendra Fadnavis

Goa Election 2022 | विश्वास आणि विकासाच्या आधारावर जनतेने मतं दिली – Devendra Fadnavis

| Edited By: | Updated on: Mar 10, 2022 | 8:40 PM

मत विभागून देखील नाही तर लोकांनी दिलेल्या पॉझिटिव्ह व्होटवर आम्ही निवडून आलो आहोत. त्यानंतर गोव्यातील या यशाचे श्रेय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही दिले पाहिजे. गोव्यात डबल इंजिन सरकारने जे काम केलं आहे, त्याचाच हा विजय आहे.

गोव्यात भाजपला लख्ख मिळवून दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील नागरिकांचं अभिनंदन. तसे या विजयाचे श्रेय कुणाचे हे सांगताना ते म्हणाले, ‘ भाजप नेता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना गोव्यातील यशाचे श्रेय जाते. मोदींनी देशात जो विश्वास तयार केलाय त्यामुळे गोव्यात ही मतं मिळाली आहेत. लोक म्हणत होते अँटी इन्कबन्सी फॅक्टरचा प्रभाव गोव्यात होईल आणि भाजपला जनता नकार देईल. मात्र तसे झाले नाही. मत विभागून देखील नाही तर लोकांनी दिलेल्या पॉझिटिव्ह व्होटवर आम्ही निवडून आलो आहोत. त्यानंतर गोव्यातील या यशाचे श्रेय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही दिले पाहिजे. गोव्यात डबल इंजिन सरकारने जे काम केलं आहे, त्याचाच हा विजय आहे.