Chandrakant Patil : ‘मी सिनिअर मंत्री आता फक्त…’, चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर? भर कार्यक्रमात काय बोलून गेले?

Chandrakant Patil : ‘मी सिनिअर मंत्री आता फक्त…’, चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर? भर कार्यक्रमात काय बोलून गेले?

| Updated on: Apr 22, 2025 | 6:41 PM

तंबाखू आणि व्यसनामुळे काही देशातील तरूण पिढी उद्ध्वस्त झाली. त्या देशांची लोकसंख्या कमी होतेय. जर्मनीने महाराष्ट्राला चार लाख पोरं मागितली आहेत. आपण 10 हजार तरुण पाठवले आहेत. आगामी काळात आपली तरुणाई जपली नाही, तर अशीच स्थिती होईल, अशी भीती चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली.

भाजपाचे नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाबाबत एक वक्तव्य केलं. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आलेत. महाराष्ट्रात माझं फक्त गृहखातंच राहिलं आहे. बाकी सगळी खाती झाली, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तासगावमध्ये शिवेनारी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. या भाषणादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी महिलांच्या सर्व आजारांवर मोफत उपचार करणारे एक रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. जिजामातांच्या नावाने महिलांच्या आजारासंबंधीचे एक क्लिनिक उभारले जाईल. या क्लिनिकमध्ये रक्ततपासणी मोफत, इंजेक्शन मोफत, औषधं, प्रसूती, शस्त्रक्रिया असं सगळं मोफत केलं जाईल, असेही चंद्रकांत पटालांनी सांगितलं.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ही काही सरकारी योजना नाही. सरकारी योजना वेगळ्या आहेत. मी मंत्री आहे. एक सिनिअर मंत्री आहे. महाराष्ट्रात फक्त गृहखातं राहिलं, बाकी सर्व खाती झाली, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केलं. मी मंत्री आहे, तरीही माझी अशी धारणा आहे की, आयजीच्या जीवावर बायजी उधार असं कशाला हवं. सरकारच्या योजना मी कशाला चालवायच्या. सरकार त्या योजना चालवेल. पण मग मी काय करणार? असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित करून त्यांनी एक योजना सांगितली.

Published on: Apr 22, 2025 06:41 PM