मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले तेच…, गिरीश महाजनांचा रोख कुणावर?

| Updated on: Apr 17, 2024 | 3:04 PM

खडसेंना आलेल्या धमकीवर बोलताना महाजन म्हणाले, याबाबतीत मला काही जास्त सांगता येणार नाही, मागील काळामध्ये त्यांना दाऊदकडून धमक्या आल्या असल्याचे ते सांगतात. पण मला काही माहीत नाही, मला वाटतं तेच याबाबतीत सांगू शकतील खडसे मोठे नेते असल्याने त्यांना धमक्या मोठ्या येतात, पोलीस यंत्रणांनी तक्रार केली असेल तर चौकशी करतील

Follow us on

एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना धमक्या देखील मोठ्या येतील, असं वक्तव्य करत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना चिमटा काढला आहे. खडसेंना आलेल्या धमकीवर बोलताना महाजन म्हणाले, याबाबतीत मला काही जास्त सांगता येणार नाही, मागील काळामध्ये त्यांना दाऊदकडून धमक्या आल्या असल्याचे ते सांगतात. पण मला काही माहीत नाही, मला वाटतं तेच याबाबतीत सांगू शकतील खडसे मोठे नेते असल्याने त्यांना धमक्या मोठ्या येतात, पोलीस यंत्रणांनी तक्रार केली असेल तर चौकशी करतील. मी राज्याचा गृहमंत्री नसल्याने त्यांच्या सुरक्षित वाढ होईल की नाही याबद्दल मी जास्त काही सांगू शकत नाही, त्यांना फोन कुठून आले? कुणी केले? का केले? हा चौकशीचा भाग आहे. मात्र दाऊद भाईचे आणि त्यांच्या गॅंगच्या सदस्यांचे यांच्याशी काही संबंध असल्याचे कुठे दिसत नाही, असे गिरीश महाजन यांनी म्हटले. खडसे भाजपमध्ये आले म्हणून दाऊद इब्राहिम त्यांना काही धमक्या देईल, अशी काही परिस्थिती नाही कारण अनेक लोक हे भाजपमध्ये आलेले आहेत त्यांना काही अजून धमक्या आलेल्या नाही, असा टोलाही लगावला.