कोल्हापुरात वाद चिघळला; नितेश राणे याचं मोठं वक्तव्य; म्हणाले,  ‘हातात तलवारही घेऊ’

कोल्हापुरात वाद चिघळला; नितेश राणे याचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘हातात तलवारही घेऊ’

| Updated on: Jun 07, 2023 | 1:29 PM

येथे काही तरुणांनी औरंगजेब याचे आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवले होते. यामुळे तनावाचे वातावरण निर्माण झाले होतं. दरम्यान, या तरूणांवर कारवाईची मागणी करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिलीय. तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटना एकत्र आंदोलन करत आहेत.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 349 व्या शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या दिवशीच कोल्हापुरमध्ये एक घटना घटली. ज्यामुळे अख्ख शहर आज बंद करण्यात आलं आहे. येथे काही तरुणांनी औरंगजेब याचे आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवले होते. यामुळे तनावाचे वातावरण निर्माण झाले होतं. दरम्यान, या तरूणांवर कारवाईची मागणी करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिलीय. तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटना एकत्र आंदोलन करत आहेत. यावरून पोलीसांनी हे आंदोलन चिघळताना पाहून लाठीचार्ज केला आहे. यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी येथे इशारा देताना, याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी. तर हे आमच्या राज्यात सहन होणार नाही. महाराजांच्या आणि हिंदूच्या अस्मितेसाठी आम्हाला उद्या तलवारही हातात घ्यावी लागली तर आम्ही तयार आहोत.

Published on: Jun 07, 2023 12:32 PM