‘योध्याला वय असतं’, नारायण राणे यांची अजित पवार यांच्या प्रवेशावर प्रतिक्रिया, पवार यांच्यावर जोरदार टीका

‘योध्याला वय असतं’, नारायण राणे यांची अजित पवार यांच्या प्रवेशावर प्रतिक्रिया, पवार यांच्यावर जोरदार टीका

| Updated on: Jul 10, 2023 | 7:18 AM

शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर त्यांच्यापाठोपाठ इतर आठ आमदारांची देखील मंत्रीपदी वर्णी लागली. त्यावरून राज्यातील राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे.

सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह काही आही आमदारांनी बंड केलं. त्यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर त्यांच्यापाठोपाठ इतर आठ आमदारांची देखील मंत्रीपदी वर्णी लागली. त्यावरून राज्यातील राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. तर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आता राज्यभर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची नाशिक येवला येथे सभाही पार पडली. यावरून भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी, यावेळी योद्धा कोणाला म्हणाव, याला काही व्याख्या आहे. आर्मीत घेताना 82 वर्षाच्या योध्याला घेत नाहीत. योध्याला वय असत असा टोला लगावला आहे. तर मला वाटतं मी योद्धा आहे, धावणं, फीरणं गतीने काम करण मला त्यांच्या वयावर बोलायचे नाही पण ते जे कॅम्पेनींग करतायत त्यात काय अर्थ नाही. राष्ट्रवादीचे दोन भाग झालेले आहेत. मोठा भाग 40 पेक्षा जास्त भाजप सरकार सोबत आलेले आहेत त्यामुळे सरकार मजबूत झालेल आहे.

Published on: Jul 10, 2023 07:18 AM