Budget 2023 : अर्थसंकल्पावर प्रसाद लाड म्हणाले, पुढच्या 5 वर्षात जगात बलवनान अर्थव्यवस्था असणार

| Updated on: Feb 01, 2023 | 11:57 AM

देशाला नवी दिशा देणारा आणि राज्याचा विकास करणारा हा आजचा अर्थसंकल्प, प्रसाद यांनी व्यक्त केला विश्वास

Follow us on

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज त्यांचा पाचवा अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प असून यामध्ये सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थसंकल्प देशासाठी सादर केला जात आहे. देशाला नवी दिशा देणारा आणि राज्याचा विकास करणारा हा आजचा अर्थसंकल्प असेल. यासह सर्वच क्षेत्रात विकास घडवून आणणारा हा अर्थसंकल्प असणार आहे.’ असे प्रसाद लाड म्हणाले. सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पातून काय मिळणार याबाबत बोलताना ते म्हणाले, हे सराकार सर्वसामांन्याचे आहे. त्यामुळे सामनातून काय म्हटले गेले याला अर्थ नाही ते बोगस आहे. या बजेटमधून 100 टक्के रोजगार मिळणार आहे. मोदी यांच्या नेतृत्वात पुढच्या 5 वर्षात जगात बलवनान अर्थव्यवस्था आपल्या देशाची असेल, असा विश्वासही प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे.