Bandatatya Karadkar | बंडातात्यांच्या अटकेनंतर तुषार भोसले आक्रमक, मुख्यमंत्री आणि अजितदादांना इशारा

Bandatatya Karadkar | बंडातात्यांच्या अटकेनंतर तुषार भोसले आक्रमक, मुख्यमंत्री आणि अजितदादांना इशारा

| Edited By: | Updated on: Jul 03, 2021 | 12:03 PM

बंडातात्यांना अटक करायला लाज कशी वाटली नाही. आता उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी परिणाम भोगायला तयार रहा, असा इशारा आचार्य भोसले यांनी सरकारला दिला आहे

राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. बंडातात्यांच्या अटकेनंतर भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) खवळले आहेत. मुघलांपेक्षा ठाकरे सरकार अत्याचारी आहे. बंडातात्यांना अटक करायला लाज कशी वाटली नाही. आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी परिणाम भोगायला तयार रहावं, असा दम आचार्य भोसले यांनी भरला आहे. (BJP Tushar Bhosale Criticized Thackeay Government Over Arrest bandatatya Karadkar)

Published on: Jul 03, 2021 12:03 PM