Special Report | भाजपचं मिशन मुंबई आणि टार्गेटवर शिवसेना

| Updated on: Sep 05, 2022 | 11:54 PM

मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करुन सर्वे सिद्धांतं समुद्रात बुडवलेत, अशी टीकाही शाहांनी केलीय. नेते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना, अमित शाहांच्या टार्गेटवर उद्धव ठाकरेच होते. भाजपसोबत युती तोडली, त्यामुळं आज शिवसेना छोटी पार्टी झाली, असा घणाघातही अमित शाहांनी केलाय.

Follow us on

मुंबई :  मिशन मुंबई बरोबरच, मुंबईत आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं टार्गेट होतं, उद्धव ठाकरे.शिवसेनेनंच धोका दिला.पण आता धोका देणाऱ्यांना भाजपचा कार्यकर्ता शिक्षा देण्याचं काम करणार, असा इशाराच अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना दिलाय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवरुनही अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय. शिवसेनेनं भाजपच्याच पाठीत खंजीर खुपसला. तरीही भाजपच्याच जागा अधिक आल्या. त्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करुन सर्वे सिद्धांतं समुद्रात बुडवलेत, अशी टीकाही शाहांनी केलीय. नेते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना, अमित शाहांच्या टार्गेटवर उद्धव ठाकरेच होते. भाजपसोबत युती तोडली, त्यामुळं आज शिवसेना छोटी पार्टी झाली, असा घणाघातही अमित शाहांनी केलाय.

मुख्यमंत्रिपदाचा उद्धव ठाकरेंना कोणताही शब्द दिला नव्हता. मात्र मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेनंत भाजपला धोका दिला, असं वारंवार अमित शाह सांगतायत. विशेष म्हणजे याआधीही अमित शाहांनी, उद्धव ठाकरेंवर धोका देण्याचा आरोप केला होता. उद्धव ठाकरे म्हणतात की, अमित शाहांनी धोका दिला आणि अमित शाहांचा आरोप उद्धव ठाकरेंवर आहे. आता ठाकरे असो भाजप दोघांसमोर मिशन मुंबई आहे..त्यामुळं निवडणूक महापालिकेची असली, तरी हल्लाबोल तुटलेली युती, वायदा आणि मुख्यमंत्रिपद यावरुनच होणार.