BMC on Local Train | मुंबईच्या लोकल ट्रेनसाठी निर्बंध शिथिल करण्याचा बीएमसीचा विचार

BMC on Local Train | मुंबईच्या लोकल ट्रेनसाठी निर्बंध शिथिल करण्याचा बीएमसीचा विचार

| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 2:26 PM

मुंबईबाहेरून येणाऱ्या 40 लाखांवर रेल्वे प्रवाशांमुळे कोरोना पुन्हा वाढण्याची धास्ती असल्याने एमएमआर परिसराचा आढावा घेऊनच राज्यसरकानं लोकलबाबत निर्णय घ्यावा असं मत महापालिकेनं मांडलंय.

महिनाअखेर पर्यंत विचारविनीमय करुन निर्बंध शिथीलता आणि लोकल सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मुंबईबाहेरून येणाऱ्या 40 लाखांवर रेल्वे प्रवाशांमुळे कोरोना पुन्हा वाढण्याची धास्ती असल्याने एमएमआर परिसराचा आढावा घेऊनच राज्यसरकानं लोकलबाबत निर्णय घ्यावा असं मत महापालिकेनं मांडलंय. तसंच, नाशिकहून येणारे भाजीपाला विक्रेते, कोल्हापूर, पुणे, गुजरात, पालघर आदी भागातून येणारे दूध-भाजी व्यावसायिकांच्या चाचण्या या गोष्टींचाही विचार करावा असं महापालिकेनं राज्यशासनाला सांगितलंय. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 928 दिवसांवर गेला असून, दररोज 30 हजारांवर चाचण्या होत असताना सरासरी रुग्णवाढ 0.07 टक्क्यांपर्यंत खाली आली असून, गेल्या अनेक दिवसांपासून मृत्युदरही एक टक्क्यापेक्षा कमी राहिला आहे. मुंबईत सद्यस्थितीत सुमारे सात हजार सक्रिय रुग्ण आहेत.