Washim CCTV | वाशिम शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बनली शोभेची वस्तू
वाशिम शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे मागील एका वर्षापासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील मुख्य भागातील सीसीटीव्हीच बंद असल्यामुळे महिला, मुलांच्या सुरक्षेचे काय ? असा प्रश्न विचारला जात आहे.
वाशिम : वाशिम शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे मागील एका वर्षापासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील मुख्य भागातील सीसीटीव्हीच बंद असल्यामुळे महिला, मुलांच्या सुरक्षेचे काय ? असा प्रश्न विचारला जात आहे. बंद पडलेले हे सीसीटीव्ही आमदार निधीमधून 25 लाख रुपये खर्च करुन बसवण्यात आले होते. मात्र हे सीसीटीव्ही आता बंद पडले आहेत.
