tv9 Marathi Special Report | तुमचा भुजबळ करू; या धमक्यांचं काय? छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं

tv9 Marathi Special Report | तुमचा भुजबळ करू; या धमक्यांचं काय? छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं

| Updated on: Jan 24, 2026 | 12:11 PM

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. एसीपीनंतर आता ED च्या केसमध्ये सुद्धा भुजबळ निर्दोष ठरलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सदन घोटाळा आता महाराष्ट्रात झालाच नाही का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. एसीपीनंतर आता ED च्या केसमध्ये सुद्धा भुजबळ निर्दोष ठरलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सदन घोटाळा आता महाराष्ट्रात झालाच नाही का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. ज्या भुजबळांवर प्रामुख्यांनी भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे आरोप केले, यामुळे 2 वर्ष भुजबळांना तुरंगात काढावी लागली. महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्याला इशारा देताना तुमचा भुजबळ करू अशी समीकरणं वापरली गेली आता त्याचं काय झालं? त्यावर भाजप उत्तर देणार का? असे सवाल विरोधक करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून मुक्तता झाल्यानंतर आता भुजबळ काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भुजबळ यांच्या मुक्ततेनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भुजबळ मुक्त झाले. आता भाजप आणि ईडी प्रशासनाने भुजबळांची माफी मागावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

Published on: Jan 24, 2026 12:11 PM