हिजाबचा मुद्दा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून – भुजबळ
सध्या हिजाबचा मुद्दा चांगलाच गाजतोय, हिजाबच्या मुद्द्यावरून देशभरात निर्देशनं सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान आता यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगान भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या हिजाबचा मुद्दा चांगलाच गाजतोय, हिजाबच्या मुद्द्यावरून देशभरात निर्देशनं सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान आता यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगान भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. हिजाबवरून त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाणून-बुजून हिजाबचा मुद्दा पुढे केला गेल्याची टीका त्यांनी केली आहे. मताचे ध्रुवीकरण करण्यासाठी धार्मिक मुद्दे उपस्थित केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
