शिंदे-फडणवीस सरकारमधील पालकमंत्र्यांच्या टक्केवारीचं ग्रहण काही सुटेना; आता झाला ‘यांच्यावर’ आरोप

| Updated on: Jun 06, 2023 | 8:45 AM

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे हे ठेकेदारी करतात, त्याचबरोबर कुठलेही काम दहा ते पंधरा टक्के घेतल्याशिवाय करतच नाहीत, असा आरोप माजी खासदार तसेच शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

Follow us on

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. टक्केवारी गोळा करण्यासाठी पालकमंत्र्यांनी एटंज नेमल्याचा आरोप आजबे यांनी केला होता. त्यापाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे हे ठेकेदारी करतात, त्याचबरोबर कुठलेही काम दहा ते पंधरा टक्के घेतल्याशिवाय करतच नाहीत, असा आरोप माजी खासदार तसेच शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्याच बरोबर खैरे यांनी भुमरे यांच्यावर आरोप करताना त्यांच्या मुलाच्या माध्यमातून ही ठेकेदारी आणि टक्केवारी सुरू असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सध्या राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे. यावेळी खैरे यांनी, पालकमंत्री स्वत: दारूची दुकाने चालवतात. कुठलेही काम 10 ते 15 टक्क घेतल्याशिवाय दिले जात नाही. ते स्वत:च ठेकेदार, व्यापारी बनले असल्याची टीका केली आहे.