‘लग्नात भेटल्याने युती होईल…हा,’ काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

‘लग्नात भेटल्याने युती होईल…हा,’ काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

| Updated on: Jan 30, 2025 | 12:59 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मीक कराड यांच्याशी असलेल्या निकटच्या संबंधामुळे संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबत जी भूमिका राष्ट्रवादीचे नेते अजितदादांनी घेतलीय तिच आमची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची विलेपार्ले येथील भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नात काल भेट झाली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे पुन्हा भाजपाशी मनोमिलन होणार काय ? असा सवाल केला जात आहे. या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांनी एकमेकांशी गप्पा मारल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी पाटील यांना काय युती होणार का असा प्रश्न मिश्कीलपणे विचारला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी हजरजबाबीपणा दाखवत युती झाली तर माझ्यासाठी सुवर्ण क्षण असेल असे उत्तर दिले होते. त्यावेळी ठाकरे देखील या गप्पात मोकळेपणे सामील झाले होते. या भेटीनंतर विविध चर्चांना सुरुवात झाली आङे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले की लग्नात भेट होणे म्हणजे युती होणार  हा भाबडा आहे,  विचार निदान पत्रकारांनी तरी असे करु नये असा सल्ला दिला.

Published on: Jan 30, 2025 12:57 PM