India-Pakistan : लष्करी सराव केला, क्षेपणास्त्र पुरवले; भारत-पाक तणावात चीनची भूमिका?

India-Pakistan : लष्करी सराव केला, क्षेपणास्त्र पुरवले; भारत-पाक तणावात चीनची भूमिका?

| Updated on: May 16, 2025 | 2:15 PM

India-China-Pakistan Tensions : भारत - पाकिस्तान तणावात चीनची भूमिका असल्याचे 10 पुरावे आता समोर आलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानसोबत उभा राहील असं चीनने अधिकृतपणे म्हंटलं देखील आहे. 

भारत – पाकिस्तान तणावात चीनची भूमिका असल्याचे 10 पुरावे आता समोर आलेले आहेत. चीनने पाकिस्तानला पुरवलेल्या क्षेपणास्त्राचा वापर भारताच्या विरोधात झाला असल्याचं देखील समोर आलं आहे. तर चीन आणि पाकिस्तानचा भारताच्या विरोधात अनेक वेळा लष्करी सराव झाल्याचं देखील समजलं आहे.

चीनने पाकिस्तानला पुरवलेल्या विंग लुंग ड्रोन, एचक्यु 16 क्षेपणास्त्र प्रणाली आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर भारता विरुद्ध झाला आहे. सीपीईसी प्रकल्पाच्या नावाखाली चीनकडून पीओमध्ये पीएलए युनिट आणि सुरक्षा कंपन्या तैनात करण्यात आलेल्या होत्या. चीनने अनेक वेळा जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर सारख्या संघटनांच्या दहशतवाद्यांना संयुक्त राष्ट्रांमध्ये जागतिक दहशतवादी घोषित होण्यापासून रोखलं आहे. विषय भारताविरुद्ध असला तरी तो कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानसोबत उभा राहील असं चीनने अधिकृतपणे म्हंटलं आहे.

Published on: May 16, 2025 02:15 PM