Devendra Fadnavis : इंग्रजी जवळची अन् भारतीय भाषा दूरची का वाटते? हिंदीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांचा सवाल

Devendra Fadnavis : इंग्रजी जवळची अन् भारतीय भाषा दूरची का वाटते? हिंदीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांचा सवाल

| Updated on: Apr 21, 2025 | 10:34 AM

Devendra Fadnavis on Hindi Imposition : हिंदीच्या सक्तीवरून वाद सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत हिंदी लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा म्हणण चुकीचं असल्याचं म्हंटलं आहे.

हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न होतो आहे, असं म्हणण चुकीचं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. हिंदीला विरोध करणं आणि इंग्रजीचे गोडवे गाणं हे आश्चर्यकारक असल्याचंही फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले आहेत. राज्यात हिंदीच्या सक्तीचा वाद चिघळत चालला आहे. मनसेकडून हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करण्यात आलेला आहे. त्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना फडणवीस यांनी सांगितलं की, हिंदी लादण्याचा प्रयत्न होतो आहे, हे म्हणण चुकीचं आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेचीच सक्ती असणार आहे. हिंदी सारख्या भारतीय भाषेला आपण विरोध करतो आणि इंग्रजी भाषेचे मात्र गोडवे गातो, इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो, याचं माला आश्चर्य वाटतं. इंग्रजी जवळची आणि भारतीय भाषा दूरची का वाटते? याचाही विचार केला गेला पाहिजे. नव्या शैक्षणिक धोरणात, मराठीच्या ऐवजी हिंदी अनिवार्य केलेली नाही. मराठी भाषा शिकणं अनिवार्यच आहे. पण नव्या शैक्षणिक धोरणात 3 भाषा शिकण्याकरता संधी दिलेली आहे. तीन भाषा शिकणं अनिवार्य आहे. या तीन भाषांपैकी 2 भाषा या भारतीयच असल्यापाहिजेत अशा प्रकारचा नियम आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावर बोलताना सांगितलं आहे.

Published on: Apr 21, 2025 10:18 AM