नवी मुंबईत काँग्रेसचा एल्गार, स्वबळावर निवडणूक लढणार, नाना पटोलेंची घोषणा
nana patole

नवी मुंबईत काँग्रेसचा एल्गार, स्वबळावर निवडणूक लढणार, नाना पटोलेंची घोषणा

| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 3:57 PM

नवी मुंबईत काँग्रेसचा एल्गार, स्वबळावर निवडणूक लढणार, नाना पटोलेंची घोषणा

नवी मुंबई : मुंबईपाठोपाठ नवी मुंबई महापालिका (Navi Mumbai Election) निवडणूकही स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसने (Congress) केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नवी मुंबईत काँग्रेस भवनाचे उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी स्वबळाचा नारा दिला. “अंतर्गत मतभेद मिटवता आले नाहीत तर दुसऱ्याला संधी दिली जाईल. पक्ष एकट्याचा नसतो तर त्याची विचारधारा मानणाऱ्या सर्वांचा असतो”, अशा कानपिचक्या नवी मुंबई काँग्रेसला महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या.