Ajit Pawar : अजित पवारांनी शड्डू ठोकला, उपमुख्यमंत्री असलेले दादा माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपादासाठी रिंगणात, म्हणाले…

Ajit Pawar : अजित पवारांनी शड्डू ठोकला, उपमुख्यमंत्री असलेले दादा माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपादासाठी रिंगणात, म्हणाले…

| Updated on: Jun 16, 2025 | 9:15 AM

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रिंगणामध्ये उडी घेतली आहे. इथल्या चेअरमन पदासाठी उमेदवार म्हणून दादांनी थेट स्वतःच नाव जाहीर करताच या निवडणुकीला वेगळाच रंग पाहायला मिळतोय.

सध्या चर्चा बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची होतेय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या निवडणुकीसाठी स्वतः शड्डू ठोकलाय. त्यामुळे इथल्या निवडणुकीचा एक वेगळाच रंग पाहायला मिळतोय. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नीळकंठेश्वर पॅनल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बळीराजा सहकार बचाव पॅनल, चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समिती पॅनल आणि अपक्षांचा एक पॅनल असे रिंगणात उतरले.

उपमुख्यमंत्री असलेले अजित पवारांचे एका ठिकाणी भावी मुख्यमंत्री असे लागलेले पोस्टर आपण खूप पाहिले असतील. आता तेच अजित दादा कारखान्याचे अध्यक्ष होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजित दादांनी थेट स्वतःच्या नावाची घोषणा केली. ‘मी चेअरमन झालो तर योग्य पद्धतीने कामगारांचे प्रश्न मार्गी लावेल’, असं दादा म्हणाले. तर स्वतःच्या नावाची चेअरमन पदासाठी घोषणा करून अजित दादांनी उपमुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा घालवली, अशी टीका कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी केली.

Published on: Jun 16, 2025 09:15 AM