Eknath Shinde : याआधी 21 तारखेला आम्ही मॅरेथॉन योगा केलेला अन्…, शिंदेंचा शिवसेनेतील बंडावरून ठाकरेंना खोचक टोला

Eknath Shinde : याआधी 21 तारखेला आम्ही मॅरेथॉन योगा केलेला अन्…, शिंदेंचा शिवसेनेतील बंडावरून ठाकरेंना खोचक टोला

| Updated on: Jun 21, 2025 | 1:20 PM

बाळ ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले तेव्हा शिवसेना फुटली. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. तेव्हापासून दोन्ही गटांमध्ये वाद सुरू आहेत.

आज २१ जून रोजी देशात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल करण्यात आला असता त्यांनी मिश्किल वक्तव्य केलं. याआधी २१ तारखेला आम्ही मॅरेथॉन योगा केला होता, असं म्हणत शिवसेनेतील बंडावरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग दिनानिमित्त मिश्कील टिप्पणी केल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेतील बंडावरून एकनाथ शिंदे यांनी भाष्य करत उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, २१ तारखेला आम्ही एक मोठा योग केला, तो एक मॅरेथॉन योग होता. तो योग मुंबईपासून सुरू झाला आणि त्यामुळे २१ जून रोजी महाराष्ट्रात खूप बदल झाला आहे आणि आता राज्यात आपण विकास पाहत आहात. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेपासून त्यांचा गट वेगळा झाला त्या दिवसाच्या बंडाची आठवण करून देत टोला लगावला. शिंदे म्हणाले,  ‘२१ तारखेमुळे आज महाराष्ट्रात बदल झाला आहे. मुंबईचा विकास होत आहे. हे जनतेचे आणि सामान्य लोकांचे सरकार आहे. आमच्या सरकारने खूप काम केले आहे. यावेळीही आम्ही राज्याला पुढे घेऊन जाऊ. पंतप्रधान मोदी आमच्यासोबत आहेत आणि हे डबल इंजिन सरकार आहे. अमित भाई देखील या राज्याला जिथे गरज असेल तिथे मदत करतात.’

Published on: Jun 21, 2025 01:20 PM