Mumbai Train Accident : मुंब्र्यातलं ते वळण ठरलं जीवघेणं, ट्रेनला लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले अन्.. नेमकं घडलं काय?

Mumbai Train Accident : मुंब्र्यातलं ते वळण ठरलं जीवघेणं, ट्रेनला लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले अन्.. नेमकं घडलं काय?

| Updated on: Jun 09, 2025 | 7:55 PM

मुंबईमध्ये दोन लोकल ट्रेनमधले लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले. प्रवासी एकमेकांना घासल्यामुळे रेल्वे रुळावर पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाला. दोन लोकल मधून एकूण तेरा प्रवासी ट्रॅकवर पडले अशी रेल्वे प्रशासनाची माहिती आहे. ट्रॅकवर पडलेले प्रवासी फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करत होते अशी माहिती देखील रेल्वेकडून देण्यात आली.

मुंब्र्यातील धोकादायक वळण जीवघेणं ठरलं आहे. दोन लोकलला लटकलेल्या प्रवाशांची टक्कर झाली आणि तेरा जण ट्रॅकवर पडले, चार जणांचा मृत्यू तर नऊ जण जखमी झाले. मुंब्र्यातील याच वळणावर सकाळी साडे नऊ वाजता अपघात झाला. दोन लोकल एकमेकांजवळून जात असताना लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले. त्यामुळे दोन्ही लोकल मधील १३ जण रेल्वे ट्रॅकवर पडले. रेल्वे अपघातामध्ये पोलीस कर्मचारी विकी मुख्यदल यांचा देखील मृत्यू झाला. विकी मुख्यदल ठाणे जीआरपीमध्ये कार्यरत होते. विकी मुळचे जालण्याचे होते. त्यांना तीन वर्षांचा छोटा मुलगा आहे. धोकादायक वळणावर दोन लोकलमध्ये अत्यंत कमी अंतर आहे. अंतर इतकं कमी आहे की दोन्ही लोकलमधले प्रवासी लटकलेले असले तर ते एकमेकांना धडकू शकतात. मुंबईमध्ये कामाला जाणाऱ्यांची सकाळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. दोन्ही ट्रेन खचाखच भरलेल्या होत्या. दोन्ही ट्रेनमधले प्रवासी दरवाज्यामध्ये लटकत होते. यातले अनेक प्रवासी ट्रेनच्या फुटबोर्डवर उभे होते, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.

Published on: Jun 09, 2025 07:55 PM