निवडणूक आयोग एवढा पगार कसला घेतात? उद्धव ठाकरेंचा संताप

निवडणूक आयोग एवढा पगार कसला घेतात? उद्धव ठाकरेंचा संताप

भीमराव गवळी | Updated on: Jan 15, 2026 | 1:30 PM

मतदानाला सुरूवात झाल्यापासून EVM मशीन बंद पडण्याचा आणि बोटावरील शाई पुसण्याचा एकच गोंधळ पहायला मिळत आहे. यावर उद्धव ठाकरेंनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एवढा गोंधळ जर या निवडणुकीत होतोय तर निवडणूक आयोग पगार कसला घेतात? असा सवाल ठाकरेंनी उपस्थीत केलाय

देशातील लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मतदान करा, असं आवाहन शिवसेना उबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी मतदारांना केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज वांद्रे येथे सपत्नीक मतदान केलं. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी हे आवाहन केलं आहे. राज्यात सगळीकडे मतदार मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करत आहेत. मात्र मतदानाला सुरूवात झाल्यापासून EVM मशीन बंद पडण्याचा आणि बोटावरील शाई पुसण्याचा एकच गोंधळ पहायला मिळत आहे. यावर उद्धव ठाकरेंनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एवढा गोंधळ जर या निवडणुकीत होतोय तर निवडणूक आयोग पगार कसला घेतात? असा सवाल ठाकरेंनी उपस्थीत केलाय. ‘निवडणुकीचा आणि मतदार याद्यांचा घोळ थांबवला गेला पाहिजे, नाहीतर निवडणूक आयोगावर कारवाई झाली पाहिजे’ अशी मागणी ठाकरेंनी केली आहे.

Published on: Jan 15, 2026 01:30 PM