मौका सभी को मिलता है! भाषणातून धनंजय मुंडेंची डायलॉगबाजी
धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना धुरंधर चित्रपटातील हिरो कोण असे विचारले असता, त्यांनी अक्षय खन्नाचे नाव घेतले. यावर मुंडेंनी हात जोडले. सिनेमातील खलनायक लक्षात राहतात, पण नायक नाही, असे म्हणत मुंडेंनी ही तुलना राजकारणाशी केली. सर्वाधिक मते मिळवूनही संकटे येतात, असे नमूद करत त्यांनी समर्थकांना एकजुटीचे आवाहन केले.
धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सिनेमातील नायक आणि खलनायक यांच्या स्मरणशक्तीबद्दल महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले की, सिनेमातील खलनायक प्रेक्षकांच्या जास्त लक्षात राहतो, पण नायक मात्र विस्मृतीत जातो, ही परिस्थिती बदलायला हवी.
मुंडेंनी विद्यार्थ्यांना धुरंधर चित्रपटातील नायक कोण आहे, असा प्रश्न विचारला. विद्यार्थ्यांनी तत्काळ अक्षय खन्नाचे नाव घेतले. विद्यार्थ्यांचे हे उत्तर ऐकून धनंजय मुंडे यांनी हात जोडले. यावर भाष्य करताना मुंडे म्हणाले की, एखादा सिनेमा बनवताना मुख्य कलाकार मागे पडतो, पण त्यातील खलनायक इतका प्रभावी ठरतो की, आज त्या नायकाचे नाव कोणाला आठवत नाही. त्यांनी रणवीर सिंगच्या नावाचाही उल्लेख करत, त्याचे नावही कोणाला आठवत नाही, असे म्हटले.
ही चर्चा त्यांनी राजकारणाशी जोडली. “महाराष्ट्रात सगळ्यात नंबर एकला मते घेऊन मायबाप जनतेने मला निवडून दिले, तरीही इतकी संकटे आपल्या नशिबाला येतात याचा विचार करा,” असे मुंडे म्हणाले. स्वर्गीय मुंडे साहेबांपासून “वंचितमधला किंचित माणूस पुढे यायला लागला की त्याला कसे खाली ओढतात” याची आपल्याला माहिती असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, जोपर्यंत समर्थक त्यांच्या पाठीशी विश्वासार्हाणे उभे आहेत, तोपर्यंत काळजी करण्याचे कारण नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
