Maharashtra Local Body Election :  परळीच्या दणदणीत विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला

Maharashtra Local Body Election : परळीच्या दणदणीत विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला

| Updated on: Dec 21, 2025 | 1:57 PM

परळीच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीने जवळपास सर्व जागांवर विजय मिळवला. धनंजय मुंडे यांनी या विजयाचे श्रेय परळीच्या जनतेला दिले असून, त्यांच्यावर आणि परळीवर टीका करणाऱ्यांना जनतेनेच योग्य धडा शिकवल्याचे म्हटले आहे. जनतेने पुन्हा एकदा परळी नगरपरिषदेवर विश्वास दाखवला.

परळीतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीने एकतर्फी विजय मिळवला असून, केवळ एक-दोन जागा वगळता सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. या विजयानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हटले की, ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली आणि माझ्या परळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांना परळीच्या मायबाप जनतेने धडा शिकवला आहे. प्रचारकाळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला, भाषण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला, असे मुंडे यांनी सांगितले. मात्र, निवडणुकीला विलंब लागला असला तरी २१ तारखेला परळीच्या जनतेने अशा टीकाकारांच्या तोंडाला चपराक दिली आहे. जिल्ह्यामध्ये खासदार तळ ठोकून राहिले असले तरी परळीच्या जनतेवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही, असेही त्यांनी नमूद केले. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पातळीवर जुळले नसताना काही ठिकाणी कमळाला (भाजप) विजय मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परळी नगरपरिषदेवर जनतेने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे, असे म्हणत मुंडे यांनी जनतेचे आभार मानले.

Published on: Dec 21, 2025 01:57 PM