Eknath Shinde | सत्ता, संघर्ष आणि राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे यांचं ठाम प्रतिपादन | 77th Republic Day | Flag Hoisting

Eknath Shinde | सत्ता, संघर्ष आणि राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे यांचं ठाम प्रतिपादन | 77th Republic Day | Flag Hoisting

| Updated on: Jan 26, 2026 | 10:26 AM

भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात झेंडावंदन करत जनतेशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांनी 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमात देशप्रेम आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला.

भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात झेंडावंदन करत जनतेशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांनी 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमात देशप्रेम आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. यावेळी त्यांनी प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला. प्रजासत्ताकामध्ये आधी प्रजा येते आणि मग सत्ता येते, असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्याचबरोबर “सत्ता, संघर्ष आणि राजकारणापेक्षा राज्य आणि देश महत्वाचा आहे” असंही शिंदे म्हणाले. देशाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असून संविधानाच्या मूल्यांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला अभिवादन करत महाराष्ट्र आणि देशाच्या प्रगतीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट केले.

Published on: Jan 26, 2026 10:26 AM