निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद : आमच्यासाठी सर्व राजकीय पक्ष समान – ज्ञानेश कुमार

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद : आमच्यासाठी सर्व राजकीय पक्ष समान – ज्ञानेश कुमार

| Updated on: Aug 17, 2025 | 3:28 PM

राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत, निवडणूक आयोगाने मतदार यादीबाबतच्या आरोपांना खंडन केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सर्व पक्षांना समान वागणूक दिल्याचे स्पष्ट केले.

नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी यावेळी सांगितले की, आमच्यासाठी सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष असा भेद नाही. सर्व राजकीय पक्ष आमच्यासाठी समान आहेत.

आज निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, मतदार यादीवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. आयोगाने एका निवेदनात म्हटले की, मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत सर्व राजकीय पक्षांचा सहभाग असतो. मात्र, पक्षांच्या बूथ स्तरावरील प्रतिनिधींनी मसुदा यादी नीट तपासली नाही आणि वेळेत आक्षेप नोंदवले नाहीत.

यापूर्वी, 7 ऑगस्ट रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. ते म्हणाले होते, निवडणुकीत मत चोरी होत आहे, आणि यात निवडणूक आयोगाचा सहभाग आहे. याचे पुरावे आमच्याकडे असून, हे सर्व भाजपच्या सांगण्यावरून होत आहे.

Published on: Aug 17, 2025 03:28 PM