tv9 Marathi Special Report | ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग

tv9 Marathi Special Report | ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग

| Updated on: Jan 22, 2026 | 11:30 AM

ठाकरे बंधू अनेक वर्षांनंतर राजकीयदृष्ट्या एकत्र आल्यानंतर त्यांच्या एकीत पहिला तडा गेल्याचं चित्र दिसत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. प्रचारादरम्यान भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप करणाऱ्या मनसेने निकालानंतर शहराच्या विकासाचं कारण पुढे करत भूमिका बदलली आहे.

अनेक वर्षानंतर ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र आल्यानंतर त्यांच्या एकीत पहिला मिठाचा खडा पडला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेच्या नगरसेवकांनी शिंदेंच्या सेनेला पाठिंबा दिलाय. पाठिंबा देण्याचं कारण सांगत मनसेचे नेते राजू पाटील यांनी अजब युक्तीवाद केलाय. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रचारादरम्यान मनसेने भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. आता निकालानंतर मनसेने शहराच्या विकासाचं कारण देत शिंदेंना पाठिंबा जाहीर केलाय. मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर स्थानिक पातळीवरचा निर्णय असं म्हणत, पाठिंब्याला सहमती दर्शवली आहे.

 

 

Published on: Jan 22, 2026 11:30 AM