हा निर्णय स्त्रीच्या खांद्यावरचं ओझं कमी करणारा! चित्रा वाघ यांचा नवा व्हिडीओ

हा निर्णय स्त्रीच्या खांद्यावरचं ओझं कमी करणारा! चित्रा वाघ यांचा नवा व्हिडीओ

| Updated on: Sep 05, 2025 | 1:59 PM

नुकत्याच झालेल्या जीएसटी सुधारणांमुळे भारतीय महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाच आणि अठरा टक्केच्या सोप्या स्लॅब्समुळे कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि सोपी झाली आहे. शिक्षण, आरोग्य आणि जीवन विमा जीएसटीच्या व्याप्तीबाहेर काढल्याने कुटुंबांवरील आर्थिक ओझे कमी झाले आहे. हे सुधारणा ईझ ऑफ लिविंग वाढविण्याकडे एक पाऊल आहे.

भाजप नेत्या चित्र वाघ यांचा जीएसटी मधील बदलांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देणारा एक व्हिडीओ समोर आला असून त्यांनी त्यात मोदी सरकारच्या कामाचं कौतुक केलं आहे.

या व्हिडीओ मध्ये बोलताना वाघ यांनी म्हंटलं आहे की, भारतातील महिलांना घराचे कामकाज आणि लहान व्यवसाय सांभाळताना करांच्या गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. पण, केंद्र सरकारने नुकत्याच जीएसटीमध्ये केलेल्या सुधारणांमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्व आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या प्रयत्नांमुळे जीएसटी आता अधिक सोपा झाला आहे. पाच आणि अठरा टक्के अशा सोप्या स्लॅब्समुळे पारदर्शकता आणि सोयीस्करपणा वाढला आहे. शिक्षण, आरोग्य आणि जीवन विमा जीएसटीच्या कक्षेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतल्याने कुटुंबांवरील आर्थिक ताण कमी झाला आहे. हे सुधारणा केवळ कर सुधारणा नाहीत तर ईझ ऑफ लिविंगचा पाया आहेत.

Published on: Sep 05, 2025 01:59 PM