India-Pakistan Conflict : पाकचे धाबे दणाणले; भारताकडून प्रत्युत्तराच्या भीतीने पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या भीतीने पाकिस्तानने लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केलेली आहे.
भारताच्या भीतीने पाकिस्तानने लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केलेली आहे. आयएसआय आणि पाकिस्तान सरकारला भारताकडून प्रत्युत्तराची भीती आहे. भारताकडून हाफिज सैदचा खात्मा केला जाऊ शकतो, अशी भीती पाकला वाटत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या माजी आर्मी अधिकाऱ्याकडे हाफिज सैदच्या सुरकशेजी जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसंच हाफिज सैद हा सध्या लाहोरमध्ये सरकारी सुरक्षेखाली राहात असल्याची सुद्धा माहिती आता समोर आली आहे. हाफिज सैदच्या घराखाली बंकर सारख्या सुविधांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. हाफिज सैदच्या राहत्या जागेत मशीद, मदरसा, उद्यान आणि एक भूमिगत बंकर देखील आहे. त्याच्या घराजवळ एसएसजी कमांडो तैनात करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तान आणि हाफिज सैदचे भारताला घाबरून चांगलेच धाबे दणाणलेले दिसत आहेत.
Published on: May 01, 2025 05:05 PM
