‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’, कोल्हापूर उत्तरच्या विजयानंतर मुश्रीफ, सतेज पाटलांचा हातात हात
कोल्हापुरातील सगळ्या निवडणुका या जोडगोळीने मोठ्या शिताफीने जिंकल्या आणि भाजपला नामोहरम केलं. आता कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयातही या जोडगोळीचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच विजयानंतर गुलालाने माखलेल्या अवतारात मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, हे गाणंही गायलं.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी विजय मिळवला आहे. जयश्री जाधव यांनी भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांचा 18 हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव केलाय. या विजयानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांसह नेत्यांनीही गुलालाची उधळण केली. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून कोल्हापुरात हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची जोडगोळी पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातील सगळ्या निवडणुका या जोडगोळीने मोठ्या शिताफीने जिंकल्या आणि भाजपला नामोहरम केलं. आता कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयातही या जोडगोळीचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच विजयानंतर गुलालाने माखलेल्या अवतारात मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, हे गाणंही गायलं.
