ठाकरेंसह शिंदे गटाने निवडणूक आयोगाला कोणते दिले पर्याय? पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये मिळावा नवे अपडेट tv9 वर

ठाकरेंसह शिंदे गटाने निवडणूक आयोगाला कोणते दिले पर्याय? पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये मिळावा नवे अपडेट tv9 वर

| Updated on: Oct 10, 2022 | 4:04 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ठाकरेंनी फक्त वेळकाढूपणा केला असे फडणवीस म्हणाले.

शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पक्षाच्या नावाचे 3 पर्याय दिले आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेबांची आणि बाळासाहेवांची शिवसेना अशा नावांचे पर्याय आयोगाला शिंदे गटाने दिले आहेत. तर सत्ता संघर्षानंतर आता ठाकरे-शिंदे गटात निवडणूक चिन्हावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटाकडून त्रिशूळ आणि उगवत्या सुर्याचा पर्याय आयोगाकडे दिले आहे. तर हे दोन्ही चिन्ह आयोगाकडून नाकारण्याची शक्यता. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पक्षाच्या नव्या चिन्हासाठी गदा, त्रिशूळ आणि उगवत्या सुर्याचा पर्याय दिला आहे. तर उद्धव ठाकरेंकडून त्रिशूळ, मशाल आणि उगवत्या सुर्याचा पर्याय देण्यात आला आहे. तर नवं चिन्ह हे सेनेसाठी क्रांतिकारक ठरेल असे खासदार संजय राऊत यांनी गोठलेल्या चिन्हावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ठाकरेंनी फक्त वेळकाढूपणा केला असे फडणवीस म्हणाले. यादरम्यान शिंदे गटाचे संजय शिरसाठ यांनी देखिल उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तर आयोगाने दिलेला निर्णय हा ठाकरे यांना मान्य करावाच लागेल. त्यांनी वेळेत प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही असेही शिरसाठ यांनी म्हटलं आहे.