Palghar Rain : मुलं शाळेत अन् शाळेबाहेर गुडघाभर पाणी, पाण्यात सोसायटी की सोसायटीत पाणी… बघा VIDEO
मुंबईतील सततच्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून, वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसानं मुंबई आणि मुंबईच्या आसपासची शहरं अक्षरशः झोडपून काढली आहे. अशातच वसई, विरार आणि नालासोपारा येथे कालपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रात्रीपासून सतत होणाऱ्या पावसामुळे पालघर जिल्ह्यात सगळीकडेच पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळतंय. विरार पश्चिम भागात गुडघाभर पाणी भरलं असून नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. विरार पश्चिम भागातील जवळपास ३५ ते ४० इमारती या पाण्यात अर्ध्या बुडाल्याच दिसतंय. तर दुसरीकडे सकाळी पावसाचा जोर कमी असताना विद्यार्थी शाळेत आले होते. मात्र नंतर अचानक पावसाचा जोर वाढल्याने शाळेबाहेर तळंच झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी आता शाळेतच अडकल्याची माहिती मिळतेय. विरार पश्चिम भागात स्विमिग पूल निर्माण झाल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Published on: Aug 18, 2025 12:13 PM
