Nanded Cloudburst : नांदेडमध्ये कहर, मुखेडमध्ये तुफान पाऊस अन् ढगफुटी, मदतीला धावली आर्मी

Nanded Cloudburst : नांदेडमध्ये कहर, मुखेडमध्ये तुफान पाऊस अन् ढगफुटी, मदतीला धावली आर्मी

| Updated on: Aug 19, 2025 | 10:06 AM

फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस सुरू आहे. पण नांदेडच्या मुखेड तालुक्याला अधिक फटका बसलाय. अक्षरशः ढगफुटी झाल्याने गाव पाण्याखाली गेली असून एनडीआरएफ सह सैन्यही मदतीसाठी आले आहे.

नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटी झाली. ज्यात गावंच्या गावं पाण्याखाली गेली. परिस्थिती एवढी भीषण आहे की एनडीआरएफ सह सैन्यही मदतीसाठी दाखल झाले. मुखेड तालुक्यात तब्बल २६० मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे लिंडी नदीला पूर आला आणि याच पुराच पाणी रावणगाव, भासवाडी, भिंगेली आणि हासनाळ गावात शिरलं. एनडीआरएफच्या पथकांनी रावणगावातून तब्बल २५६ जणांना बाहेर काढले. हे नागरिक १२ पेक्षा जास्त तासांपासून घरात अडकून पडले होते. तर हासनाळ गावात दोन महिलांचे मृतदेह सापडले असून आतापर्यंत पाच जण वाहून गेल्याची माहिती आहे. हासनाळ गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय. एनडीआरएफच्या पथकांनी महिला, मुलं आणि वृद्धांना बाहेर काढलं, त्यांची सुखरूप सुटका केली. या ढगफुटीमुळे पशुधनाचंही नुकसान झाले. मुकरमाबाद गावात पुराच्या पाण्यात बुडून ४० ते ५० मेंढ्यांचा मृत्यू झाला.

Published on: Aug 19, 2025 09:58 AM