Mumbai Heavy Rain : मुंबईत पावसाचं थैमान, कुठं जीव वाचवण्याची धडपड तर कुठं… बघा मुसळधार पावसाची थक्क करणारी 10 दृश्य
ठाण्यातील काही भागात पुराच्या पाण्यासोबत साप घरात शिरले त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कुर्ल्यातील एल्बीएस मार्गावर पाणी साचलं तर क्रांतीनगर परिसरात अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करण्यात आलं.
मुंबईला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. वसईतील भोईदापाडा परिसर पाण्याखाली गेलाय. अग्निशमन दलाकडून लोकांच रेस्क्यू सुरू करण्यात आलंय. मुंब्रा येथे मुसळधार पावसान रस्त्यांना नद्यांच स्वरूप एक दुचाकी वाहून गेली. पवईतील फिल्टर पाडा भागात मिठी नदीत तरुण वाहून गेला एका संरक्षक भिंतीला लटकून या तरुणाने स्वतःला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र पाण्याच्या प्रवाहात हा तरुण वाहून गेला पुढे काही नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करत या तरुणाला सुरक्षितपणे बाहेर काढलं. सायन-कुर्लादरम्यान मध्य रेल्वे मार्गावर पाणी आलंय या रेल्वे ट्रॅकला अक्षरशः नदीच स्वरूप आलं त्यामुळे वाहतूक अतिशय संथगतीने सुरू आहे.
दुसरीकडे वसईतील मिठाघरांना चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम प्रशासनाने हाती घेतलं. मुसळधार पावसामुळे घोडबंदर रोड पाण्याखाली गेला त्यामुळे या रोडवर मोठी वाहतूक कोंडी झालीये. ठाण्यातील माजीवाडा परिसरात कारखान्यामध्ये गणेश मूर्तीकारांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय या पावसामुळे नाल्यातील पाणी या कारखान्यात शिरल्यामुळे अनेक गणेश मूर्तींच नुकसान झाल्याचे पाहायला मिळतंय.
