पुण्यात आणखी एक मोठी कारवाई, राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले 1 कोटीचे मद्य
पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. एक ट्रकमधून नेण्यात येणारे कोट्यवधीचे मद्य जप्त करण्यात आलं आहे. ४० हजार पेक्षा जास्त दारूच्या बाटल्या आणि साधारण १ कोटी १९ लाख रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.
पुणे | 2 नोव्हेंबर 2023 : पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे, गोवा राज्य निर्मीत विदेशी मद्याचा एक ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला. या ट्रकमध्ये असलेले कोट्यवधीचे मद्य जप्त करण्यात आलं आहे. मुबंई बंगलोर महामार्गावर रावेत या ठिकाणी हा ट्रक पकडण्यात आलाय. यामध्ये विदेशी मद्य असणाऱ्या १२५७ बॉक्स जप्त करण्यात आले. जवळपास ४० हजार पेक्षा जास्त दारूच्या बाटल्या आणि साधारण १ कोटी १९ लाख रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपीना देखील अटक करण्यात आली आहे. विजय चव्हाण, सचिन धोत्रे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपीना 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Published on: Nov 02, 2023 11:30 PM
