Satara मध्ये घडलेली घटना अमानुष, Rupali Chakankar यांचे कारवाईचे आदेश

| Updated on: Jan 20, 2022 | 4:12 PM

क्षुल्लक कारणावरुन माजी सरपंच आणि त्याच्या पत्नीने मिळून वनरक्षक दाम्पत्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज साताऱ्यात घडली आहे. हे दोघे पती पत्नी साताऱ्यातील पळसवडे गावचे रहिवासी आहेत.

Follow us on

क्षुल्लक कारणावरुन माजी सरपंच आणि त्याच्या पत्नीने मिळून वनरक्षक दाम्पत्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज साताऱ्यात घडली आहे. हे दोघे पती पत्नी साताऱ्यातील पळसवडे गावचे रहिवासी आहेत. रामचंद्र जानकर आणि प्रतिभा जानकर अशी आरोपींची नावे आहेत. जानकर दाम्पत्याने महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला 4 महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्या तर डोक्यात दगड देखील मारल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीच्या घटनेने वन विभागात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.