India-Pakistan Conflict : भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीला मुदतवाढ दिली; पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची माहिती
भारत - पाकिस्तानमधील युद्धबंदी 18 मे पर्यंत वाढवलेली असल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली आहे.
भारत – पाकिस्तानमधील युद्धबंदी 18 मे पर्यंत वाढवलेली आहे, असं डार यांचं म्हणण आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांची ही माहिती आहे.
भारत – पाकिस्तानमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला युद्धबंदीचा निर्णय हा 18 मे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनीही गुरुवारी पुष्टी केली आहे की पाकिस्तान आणि भारताच्या (डीजीएमओ) युद्धबंदीवर चर्चा करण्यासाठी हॉटलाइनवर चर्चा केली आणि त्यानंतर मुदतवाढ अंतिम करण्यात आली. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधले संबंध हे अधिक तणावाचे झाले होते. भारताच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झालेल्या कारवाईने पाकिस्तान घाबरला होता. त्यानंतर युद्धजन्य परिस्थिती सीमेवर निर्माण झाली होती.
Published on: May 16, 2025 10:32 AM
