Operation Sindoor : भारताकडून पाकचा बदला, मध्यरात्री ‘या’ 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर, बघा किती जणांचा खात्मा?
रिपोर्टनुसार बहावलपूरमध्ये जैशे मोहम्मदच्या तीन दहशतवादी तळांवर भारताचा हल्ला, पाकिस्तानच्या कुठल्याही लष्करी तळावर हल्ला केला नाही हे भारताकडून स्पष्ट करण्यात आलंय. भारताकडून सर्व मित्र देशांना पाकिस्तानवरील हल्ल्याची माहिती देण्यात आली.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताकडून जशास तसा घेण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. भारताने पाकिस्तानसह पीओकेत जोरदार हल्ला केल्याची मोठी बातमी समोर येत आहे. मधरात्री एक ते दीडच्या दरम्यान नऊ ठिकाणी भारताने दहशतवादी तळांवर हा हवाई हल्ला केला. मधरात्री एक ते दीडच्या दरम्यान भारतीय लष्कराकडून ही मोठी कारवाई करण्यात आली. ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारताने पाकिस्तानवर हा हल्ला करत भारतीय सैन्याकडून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओकेतील फक्त दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले. या हल्ल्यामध्ये बहावलपूरमध्ये 50 हून अधिक दहशतवादी मारले गेले असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.तर पाकिस्तानवरील हल्ल्यात जैशेचे टॉप आतंकवादी मारले गेल्याची माहिती समोर येतेय.
Published on: May 07, 2025 08:50 AM
