Upendra Dwivedi : पुढचं युद्ध लवकरच, आपल्याला… भारतीय लष्कर प्रमुखांचं गंभीर इशारा देत मोठं वक्तव्य
Indian Army Chief Waring : भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी असं म्हटलं की, लवकर मोठं युद्ध होऊ शकतं त्यामुळे आपल्याला ही लढाई एकत्र लढावी लागेल
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एक मोठा इशारा देत पुढचं युद्ध लवकरच होऊ शकतं, असं म्हटलंय तर आपल्याला तयार राहवं लागणार असल्याचे मोठं वक्तव्य लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलंय. इतकंच नाहीतर पुढचं होणारं युद्ध हे संपूर्ण देशाला एकत्र येऊन लढावं लागणा असल्याचेही लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले. जनरल उपेंद्र द्विवेदी आयआयटी मद्रास येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी जनरल द्विवेदी यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, युद्धात नरेटीव्ह मॅनेजमेंटची भूमिका महत्त्वाची असते. जर तुम्ही कोणत्याही पाकिस्तानीला विचारले की तुम्ही जिंकलात की हरलात, तर तो म्हणेल की त्यांचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना फील्ड मार्शल बनवण्यात आले आहे. पाकिस्तानी लोक असा विचार करत असतील की ते जिंकले असतील, म्हणूनच असीम मुनीर यांना फील्ड मार्शल बनवण्यात आले आहे.
