BIG Breaking : भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवाद्यांची यादीच जाहीर… बघा मुख्य लीडर म्हणून कोणाचं नाव समोर?

BIG Breaking : भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवाद्यांची यादीच जाहीर… बघा मुख्य लीडर म्हणून कोणाचं नाव समोर?

| Updated on: May 05, 2025 | 12:41 PM

सुरक्षा संस्थांकडून जी सक्रिय दहशतवाद्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे दहशतवादी हल्ले घडवणारा मुख्य लीडर हाफिज मोहम्मद सईद असल्याचे समोर आले आहे.

भारतीय सुरक्षा संस्थांकडून सक्रिय दहशतवाद्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. लष्कर ए तोएबा आणि जैश ए मोहम्मदशी संबंधित दहशतवाद्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सीमेपलीकडून काम करणारे हँडलर्स, लॉन्चिंग, कमांडरचीही जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये नाव आहेत.

दहशतवादी हल्ले घडवणारा मुख्य लीडर हाफिज मोहम्मद सईद

26/11 हल्ल्यासह अनेक हल्ल्यांमध्ये सहभाग असलेला झाकी उर रहमान लखवी – लष्कर ए तोएबाचे ऑपरेशनल कमांडर

26/11 हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार, आंतरराष्ट्रीय कारवाया आणि भरतीचे काम साजिद मीर उल सैफुल्लाह साजिद जट्ट करतो

मोहम्मद याह्या मुजाहिद – लष्कर ए तोएबाच्या मिडिया विभागाचा प्रमुख असून प्रचार आणि सार्वजनिक संदेश वहनाचे काम करतो

हाजी मुहम्मद अशरफ – जमात उद दावा आणि इतर आघाड्यांद्वारे निधी संकलन आणि आर्थिक रसद पुरवण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे

आरिफ कासमानी – अल कायदा सारख्या इतर दहशतवादी गटांशी संबंध निर्माण करण्यासाठी मुख्य समन्वयकाचे काम हा करतो

आदिल ठोकर – पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आलेला आणि नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी असलेला दहशतवादी म्हणून त्याचं नाव उघड

Published on: May 05, 2025 12:41 PM