Indian Tigers And Tigresses : टीव्ही 9 नेटवर्कच्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडून कौतुक
TV9 Network Indian Tigers And Tigresses : टीव्ही 9 नेटवर्कचे सीईओ बरुण दास संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मानसुख मांडविया यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी टीव्ही 9 नेटवर्कने आयोजित केलेल्या ऐतिहासिक इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस या उपक्रमाच कौतुक केलं आहे. टीव्ही 9 नेटवर्कच्या या उपक्रमा अंतर्गत देशभरातील 50 हजार फुटबॉल खेळाडूंपैकी 28 खेळाडूंना निवडण्यात आलं आहे. या सर्व 28 खेळाडूंना ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं फुटबॉल खेळण्याचं प्रशिक्षण देखील देण्यात आलं. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण घेऊन हे सर्व 28 खेळाडू आता मायदेशी परतले आहेत. विशेष म्हणजे हे सगळे खेळाडू 12 ते 14 आणि 15 ते 17 या वयोगताटातील आहेत. टीव्ही 9 नेटवर्कचे सीईओ बरुण दास यांच्या संकल्पनेमधून हा उपक्रम राबवण्यात येत असून याचं कौतुक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील केलं आहे. तर केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी या खेळाडूंना 2026च्या ओलेम्पिकसाठी कठोर परिश्रम घेण्याचं आणि फिफा विश्वचषकमध्ये देशासाठी मोठी कामगिरी करण्याचं आवाहन केलं आहे.
