युनेस्कोत शिवरायांचा आंतरराष्ट्रीय गौरव; शिवराज्याभिषेक, हिंदवी स्वराज्य अन् राजमुद्रेचंही कौतुक

युनेस्कोत शिवरायांचा आंतरराष्ट्रीय गौरव; शिवराज्याभिषेक, हिंदवी स्वराज्य अन् राजमुद्रेचंही कौतुक

| Updated on: Jul 08, 2025 | 7:45 PM

ग्रीसचे युनेस्कोमधील राजदूत जॉर्जिओस कौमुत्साकोस यांनी शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचे कौतुक करत जागतिक पातळीवर त्यांच्या विचारांचा गौरव केला आहे.

एक अभिमानास्पद बातमी आहे. छत्रपती शिवजी महाराजांचा युनेस्कोमध्ये आंतरराष्ट्रीय गौरव करण्यात आला. ग्रीसचे राजदूत राजदूत जॉर्जिओस कौमुत्साकोस यांनी छत्रपती शिवजी महाराजांवर स्तुतीसुमने उधळण्यात आली आहे. यासह छत्रपती शिवजी महाराजांचा शिवराज्याभिषेक, हिंदवी स्वराज्य आणि राजमुद्रेवरील शब्दांचं त्यांच्याकडून कौतुक करण्यात आलंय. राजदूतांनी असेही म्हटले आहे की, ‘शहाजींचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या राजमुद्रेचा महिमा चंद्राच्या कले सारखा वाढत जाणारा आहे. यापुढेही जग त्याचा सन्मान करेल आणि ती केवळ लोककल्याणासाठी चमकेल.’ राजमुद्रेत लिहिलेले शब्द ‘अतिशय ज्ञानी आणि दूरदृष्टीपूर्ण’ लिहीलेले आहेत, असं त्यांनी म्हटलंय.

Published on: Jul 08, 2025 07:45 PM